🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे सुरु आहे. फादर दिब्रिटो हे त्याचे अध्यक्ष आहेत. मोठ्या उत्साहात सकाळी ग्रंथदिंडीनं या साहित्य संमेलनाचा शुभारंभ झाला. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांनी JNU मधल्या हिंसाचारावर बोट ठेवत देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा आहे असं वक्तव्य केलं होतं. तसंच मोदी सरकारवरही टीका केली.
मात्र आज साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी “देशात अशी काहीही परिस्थिती नाही. आपण सगळे सुजाण नागरिक आहोत. आपण का अशा हिटलरशाहीच्या मागे जाऊ? असं म्हणत त्यांनी साहित्यिकांवर कोणताही दबाव नाही असंही म्हटलं आहे”. असं त्यावेळी मावळत्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी पण आपल मत व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा, उस्मानाबाद यांच्या वतीने हे 93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. साहित्य संमेलनासाठी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दोन लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीचा धनादेश संमेलनाच्या निधी संकलन समितीकडे त्यांनी सुपूर्द केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
