Share

बंद शाळांना आली भरमसाट वीजबिलं, महावितरणच्या कारभारावर शिवसेनेचे ताशेरे

Published On: 

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात मीटर रिडिंग घेणे वीज वितरण कंपनीने बंद केले होते. त्यामुळे सरासरीच्या 10% बिल ग्राहकांना ऑनलाइन पाठवण्यात येत होते. जून महिन्यात रिडिंग घेऊन ग्राहकांना बिल पाठवण्यात आले. मात्र, हे बिल बघून ग्राहक चक्रावले आहेत.

महिन्याला साधारणतः 500 ते 700 रुपये बिल येणाऱ्या लोकांना 3 महिन्याचे साडेतीन हजार ते चार हजार रुपये आले आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या लोकांना खाण्याचा प्रश्नाला समोरे जावे लगतेय. यातच हजारो रुपये कुठून आणायचे हा प्रश्न त्यांना पडलाय.

एका बाजूला भाजपने याविरोधात एल्गार पुकारला असताना आता शिवसेनेने देखील या वादात उडी घेतली आहे. कोकणातील बंद शाळांना भरमसाट बिलं आल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. महावितरणला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पत्र लिहित चांगलंच झापलं आहे. शाळा 3 महिने बंद असताना एवढं बील आलंच कसं? असा थेट सवाल राऊत यांनी विचारला आहे. शाळांना कोणच्या आधारावर ही वीज बिलं आकारली? विनायक राऊत असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला आहे 10 पेक्षा जास्त युनिट होऊ शकत नसल्याचाही दावा त्यांनी केला आहे. . tv9 मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

एकीकडे लॉकडाउनमुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले असताना अवाच्या सवा दराने वीज बिल येत असल्याने महावितरण विरोधात राज्यभरात संताप आहे. वाढीव वीज बिलाचा फटका फक्त सर्वसामान्यच नाही तर सेलिब्रेटींनाही बसत असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्री तापसी पन्नू आणि रेणुका शहाणे यांच्या पाठोपाठ आता आणखी एका कलाकाराला वीज बिलाचा फटका बसला आहे.

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी यालाही वीज बिलामुळे शॉक बसला आहे. लाखभर रुपयाचे वीज बिल आल्याचे सांगत अर्शदने अदानी ग्रुपवर आगपाखड केली आहे. ‘हायवे लुटारु ‘अदानी’कडून आलेले हे माझे वीज बिल. ज्याला आमचे बिल बघून चांगलेच हसू येत आहे. 1,03,564.00 रुपये तुमच्या खात्यातून 5 जुलै 2020 रोजी डेबिट केले’ असे ट्वीट अर्शदने केले आहे. त्यासोबत अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांचा खळाळून हसतानाचा फोटो अर्शदने शेअर केला आहे.

कुठे गेले अच्छे दिन ? सलग १२ व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ

वीज बिल दरवाढ रद्द करण्यासाठी भाजपाचे ठाणे शहरात जोरदार आंदोलन

अरे देवा… राज ठाकरेंच्या घरात कोरोनाचा प्रवेश

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!