Share

अरे देवा… राज ठाकरेंच्या घरात कोरोनाचा प्रवेश

Published On: 

मुंबई : देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गेल्या २४ तासांत कोरोना रुग्ण संख्येत उच्चांकी वाढ झाली आहे. यापूर्वीच कोरोना राजकारणात प्रवेश केला आहे, अनेक मंत्री या कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेले कृष्णकुंज येथे कोरोनाने धडक दिली आहे.

राज ठाकरे यांच्या घरी काम करणाऱ्या दोन व्यक्तींना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारीच राज ठाकरे यांच्या दोन चालकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर आता कोरोना व्हायरसने थेट राज ठाकरे यांच्या घरात शिरकाव केला आहे. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. असे वृत्त लोकसत्ताने दिले आहे .

या आधी राज ठाकरे यांच्या तीन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, सुदैवाने हे सुरक्षारक्षक करोनामुक्त झाले. पण आता राज यांच्या घरात काम करणाऱ्या दोघांचा कोरोना तपासणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. यातील एक हा राज ठाकरे यांच्या घरी घरकाम करत होता. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दादरच्या शिवाजी पार्क परिसरात राज ठाकरे यांचे कृष्णकुंज हे निवासस्थान आहे. दादर, माहीम आणि धारावी हा परिसर पालिकेच्या जी नॉर्थ या वॉर्डात येतो. काही दिवसांपूर्वी या वॉर्डात मोठ्याप्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडत होते. मात्र, आता कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या धारावीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. मात्र, माहीम आणि दादर परिसरात अजूनही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्यापाठोपाठ रावसाहेब दानवे राणेंच्या घरी

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देणार का ?

राज ठाकरे यांचे ‘नऊ’ नंबर कनेक्शन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!