मुंबई : महाराष्ट्रात आज ७८२७ कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे आता राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १,०३,५१६ इतकी झाली आहे. तर राज्यात आज ३३४० रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील डिस्चार्ज झालेल्यांची संख्या १४०३२५ इतकी झाली आहे.
दरम्यान, भिवंडी शहरात देखील लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.भिवंडी महापालिकेचे आयुक्त पंकज आशिया यांनी हे आदेश दिले आहेत. भिवंडी शहरातील वाढत्या रूग्णसंख्येचे पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आल्याची माहिती आशिया यांनी दिली आहे.
आयुक्त पंकज आशिया यांनी 19 जुलै संध्याकाळी 5 पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे, अशी माहिती दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता 12 जुलैप्रयंत भिवंडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. मात्र आत त्यामध्ये आणखी एका आठवड्याची वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, योग्य नियोजन नसल्याने सोलापुरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण हे सोलापूर शहरात आहेत. यातच आता पुण्यापाठोपाठ सोलापुरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ही साखळी तोडण्यासाठी शहरात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आला आहे. 16 जुलैच्या मध्यरात्रीपासून 26 जूलैपर्यंत लॉकडाऊन लागू असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
पुणे : लॉकडाऊनच्या धास्तीने मार्केटयार्डमध्ये पहाटेपासूनच उसळली गर्दी
सध्याचे मुख्यमंत्री हे घरात बसून केवळ आदेश देण्यात मग्न आहेत- आठवले
#DilSeThankYou : रात्रंदिवस काम करणार्या पोलिसांचे अक्षय कुमारने मानले अनोख्या पद्धतीने आभार
प्रकृती ठणठणीत असून मी क्वारंटाइन असल्याचे वृत्त खोटे- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

