🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा वाद हा 100 टक्के राजकिय हेतूने प्रेरित केलेला वाद आहे. भारताच्या कोणत्याही नागरिकांची या कायद्यामुळे नागरिकता धोक्यात येणार नाही. नागरिकत्व काढण्यासाठी नव्हे तर हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे. सोशल मीडियावर याबद्दल अपप्रचार करण्यात येत आहे. विरोध अथवा सपोर्ट द्यायचा असेल तर तो शांततेच्या माध्यमातून द्या, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आज पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सरकारला धारेवर धरले. तर नागरिकत्व सुधारणा कायद्यावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, शिवसेना तसेच आघाडीच्या जाहीरनाम्यात सरसकट कर्जमाफीच्या आश्वासनावरून टीका करताना शेतकऱ्यांच्या विश्वासघाताला सुरुवात झाली असल्याचं सांगत सरसकट कर्जमाफीच्या घोषणेचे काय झालं ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तर केलेली कर्जमाफी फसवी आहे तुम्ही दिलेला शब्द पाळावा एवढंच आमचं म्हणणं आहे.याआधी राज्यांनी केलेली कर्जमाफी ही स्वतःच्या भरवश्यावर केली आहे . केंद्राच्या भरवश्यावर कर्जमाफी करु असं म्हणणं चुकीचं आहे, असेही फडणवीस म्हणाले. तसेच ठाकरे सरकारकडून फडणवीस सरकारच्या काळात मोठे कर्ज झाले असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र आमच्या काळात राज्याची आर्थिक स्थिती उत्तम होती, असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे असा आरोप खोटा असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.
महत्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1209095584100966406?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1209093367985926144?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
