मुंबई- केंद्र सरकारने नुकतेच संमत केलेल्या कृषिविषयक कायद्यांच्या राज्यातील अंमलबजावणी संदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
या कायद्याच्या अनुषंगाने राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी देखील चर्चा करण्यात येणार असून त्याआधारे योग्य त्या सुधारणांचा मसूदा मंत्रिमंडळ उपसमितीसमोर सादर करण्यात येईल व त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांचे उत्पादन व्यापार आणि व्यवहार (प्रोत्साहन आणि सुविधा) कायदा 2020, शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) आश्वासित किंमत आणि सेवा करार कायदा, अत्यावश्यक वस्तू सुधारणा कायदा यांचे सादरीकरण करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या : –
- नागपूर : मास्क न लावणा-या नागरिकांकडून लाखो रुपयांच्या दंडाची वसूली
- आदित्य ठाकरे आमचा साधा फोनही उचलत नाही, अबू आझमींचा घणाघात
- ‘आरक्षणाचा प्रश्न संभाजीराजे आणि उदयनराजेंनी सोडवावा, मी फक्त सात बाराचा गुंता सोडवण्यासाठी’
- अहमदनगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून ‘ही’ नावे जाहीर
- उत्तरप्रदेश सरकार महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही- प्रकाश आंबेडकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

