Share

अहमदनगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून ‘ही’ नावे जाहीर

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर महापालिकेत स्थायी समिती सभापती पदाची निवडणुक झाल्यानंतर आता स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी अखेर मुहूर्त सापडला असून, आज (दि.१ ऑक्टोबर) रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.

यापूर्वीही एकदा स्वीकृत नगरसेवकपद निवडीसाठी सभा बोलविण्यात आली होती. मात्र गटनेत्यांनी सुचविलेल्या नावांचे अर्ज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बाद ठरविले होते. महापालिकेतील संख्याबळानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रत्येकी दोन आणि भाजपचा एक असे पाच सदस्य स्वीकृत म्हणून नियुक्त केले जाणार आहेत. महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीसाठी शिवसेनेकडून दोन नावे सादर करण्यात आली आहेत. संग्राम शेळके व मदन आढाव ही ती नावे आहेत.

यापूर्वीही एकदा स्वीकृत नगरसेवकपद निवडीसाठी सभा बोलविण्यात आली होती. विशेष म्हणजे तेव्हाही दिवंगत नेते अनिल राठोड यांनी देखील संग्राम शेळके व मदन आढाव हीच नावे सादर केली होती. तीच नावे आज पुन्हा सादर करून शिवसेनेने स्व.अनिलभैय्या राठोड यांचा निर्णय मान्य केल्याचे मानले जाते.

महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी पाच सदस्य स्वीकृत म्हणून नियुक्त केले जाणार आहेत. शिवसेनेत स्विकृत नगरसेवक निवडीवरुन दोन दिवसांपासून रणकंद सुरू झाले आहे. अहमदनगरमधील सावेडीचे शिवसेना विभाग प्रमुख चंद्रकांत सुर्यभान शेळके यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून स्थानिक राजकारणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र यापूर्वी सादर केलेलीच नावे पुन्हा सादर केली असल्याने त्यामुळे नवीन वादाचा प्रश्न येणार नाही, असेही मानले जाते.

भाजप व राष्ट्रवादी काॅंग्रेसने अद्याप नावे निश्चित केली नसून, दोन्ही पक्षाचे गटनेते लवकरच आपली नावे सादर करतील. आज होणाऱ्या सभेत पाच सदस्यांची नावे जाहीर होणार असून, राजकीय पक्षांनी बंद लिफाफ्यात पाठविलेल्या नावांची छाणनी होणार आहे. त्यानंतर निवडी जाहीर होतील.

महत्वाच्या बातम्या : –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!