🕒 1 min read
सातारा : पेट्रोलच्या दरात आज लीटरमागं २५ पैसे, तर डिझेलच्या दरात लीटरमागं २१ पैशांची वाढ झाली. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलीटर ८७ रुपये १४ पैसे, तर डिझेलचा दर ७८ रुपये ७१ पैसे प्रतिलीटर इतका झाला आहे. ७ जूनपासून हे दर सातत्यानं वाढत आहेत. ७ जूनच्या आधी कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर ८२ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कसलीही वाढ केली नव्हती, असं तेल पणन कंपन्यांचं म्हणणं आहे.
पवारांशी पंगा घेणाऱ्या पडळकरांना चक्क राष्ट्रवादीच्याच नेत्याने बाईकवरुन शहरभर फिरवलं
सध्या रोजच पेट्रोलचे दर वाढत चालले असून आजवरच्या इतिहासात असं कधी झालं नव्हतं. मात्र, लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या सहनशीलतेचा गैरफायदा केंद्र सरकार घेत असल्याचा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ते आज सातारा इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते.
शहीद जवान सुनील काळे यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी
कोरोनाच्या काळात कारखाने बंद असल्याचा फटका सरकारी तिजोरीला बसला. त्यामुळे कर्मचा-यांचे पगार देण्यासाठी सरकारला कर्ज काढावं लागल्याचं ते म्हणाले. आमदार पडळकरांविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी सांगितलं की, त्या व्यक्तीच्या बोलण्याला मी महत्व देत नाही. काही निवडणुकांमध्ये डिपॉझिट जप्त झालेल्या व्यक्तीच्या विधानांना महत्व देत नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
