Share

पवारांशी पंगा घेणाऱ्या पडळकरांना चक्क राष्ट्रवादीच्याच नेत्याने बाईकवरुन शहरभर फिरवलं

Published On: 

🕒 1 min read

सांगली : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

मुंबई पुण्यातून गर्दी कमी करण्यावर भर दिला पाहिजे – नितीन गडकरी

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे असं पडळकर म्हणाले आहेत.

पडळकर यांनी केलेल्या या टीकेनंतर वादाला तोंड फुटलं आहे. पडळकर यांच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. शरद पवार यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकरांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सडकून टीका केलीय. ज्या नेत्याचं डिपॉझिट जप्त झालं होतं त्याच्याविषयी काय बोलायचं. हा सूर्यावर थूंकण्याचा प्रकार आहे अशी टीका त्यांनी केली. साताऱ्यात केली.

संपूर्ण राज्यात याचे पडसाद उमटत असताना शरद पवार यांनी मात्र यावर मौन साधलं होत. मात्र पवारांनी आज साताऱ्यात यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘पडळकरांना लोकांनी बाजूल केलं आहे. त्यांच्यावर काय बोलायचं. मी पडळकर यांना फार महत्व देत नाही. त्याचं बारामतीत डिपॉजिट जप्त झाल आणि सांगलीत सुद्धा ते पडलेत त्यांना महत्व देण्याची गरज नाही.’ असा टोला लगावत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, पवारांवर टीका केल्याने पडळकरांना राज्यात फिरु देणार नाही असा पवित्रा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाने प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात थेट पडळकरांना दुचाकीवरुन फिरवलं असल्याचे वृत्त tv9 मराठीने दिले आहे.

कोरोनाचा हाहाकार; देशात 5 लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित, जाणून घ्या राज्याची स्थिती

जत नगरपालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक लक्ष्मण उर्फ टिमू एडके यांनी स्वत:च्या दुचाकीवर पडळकरांना बसवून, शहरभर फिरवून, राष्ट्रवादीच्या जखमेवर मीठ चोळले आहे. एडके एवढ्यावरच थांबले नाहीत तर याशिवाय गोपीचंद पडळकर यांचा हारतुरे घालून सत्कारही केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याच सांगली जिल्ह्यात हा प्रकार घडल्याने, आता पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!