Share

वैद्यकीय अंतिम वर्षाच्या परीक्षेआधी इंटर्नशिपला केंद्रीय परिषदेचा नकार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील अंतिम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच घेण्यात येतील तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने इंटर्नशिप सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता मात्र यास केंद्रीय परिषदेने नकार दिल्याने येत्या 31 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकार आपली बाजू भक्कमपणे मांडेल असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

अमित देशमुख पुढे म्हणाले की, राज्यातील अंतिम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाचा अभ्यासक्रम संपताच कालापव्यय टाळण्यासाठी इंटर्नशिप सुरू करून परीक्षा नंतर घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता मात्र केंद्रीय परिषदेने यास नकार दिल्याने या प्रश्नावर येत्या 31 तारखेला होणाऱ्या अंतिम सुनावणीत भूमिका मांडताना राज्य सरकार आपली बाजू लावून धरणार आहे.

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांवर

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची मनस्थिती आपण समजू शकतो. यामुळे 31 तारखेच्या अंतिम सुनावणीनंतर न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज पुणे दौरा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!