Share

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांवर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असून हे प्रमाण ५९.८४ टक्के एवढे झाले आहे. बुधवारी देखील ७४७८ रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३९ हजार ७५५ झाली आहे. बुधवारी ९२११ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४६ हजार १२९ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

बुधवारी निदान झालेले ९२११ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २९८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११०९ (६०), ठाणे- २३१ (१३), ठाणे मनपा-२८८ (१३),नवी मुंबई मनपा-३८० (६), कल्याण डोंबिवली मनपा-३०९ (१५),उल्हासनगर मनपा-८१ (७), भिवंडी निजामपूर मनपा-२४ (७), मीरा भाईंदर मनपा-१११ (३), पालघर-७९ (१), वसई-विरार मनपा-२१५ (७), रायगड-३४७ (५), पनवेल मनपा-१५० (२), नाशिक-९९ (३), नाशिक मनपा-४१० (२), मालेगाव मनपा-१८, अहमदनगर-१३३, अहमदनगर मनपा-१७४, धुळे-९० (२), धुळे मनपा-५६ (३), जळगाव-१५४ (१०), जळगाव मनपा-३७ (२), नंदूरबार-११ (३), पुणे- २९४ (१०), पुणे मनपा-१४५८ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-८३९ (१०), सोलापूर-२०४ (११), सोलापूर मनपा-४८ (४), सातारा-१४१ (७), कोल्हापूर-११२ (३), कोल्हापूर मनपा-४४ (१), सांगली-२९, सांगली मिरज कुपवाड मनपा-११०, सिंधुदूर्ग-१४, रत्नागिरी-५४, औरंगाबाद-१२९ (५), औरंगाबाद मनपा-४०९ (१२), जालना-१७ (४), हिंगोली-१० (१), परभणी-९, परभणी मनपा-२३ (२), लातूर-५२ (२), लातूर मनपा-१७, उस्मानाबाद-५१ (१), बीड-३८ (२), नांदेड-८९ (१), नांदेड मनपा-४ (२), अकोला-८ (३), अकोला मनपा-३ (१), अमरावती-२४, अमरावती मनपा-८० (३), यवतमाळ-२३, बुलढाणा-४० (२), वाशिम-२१ (१), नागपूर-९३ , नागपूर मनपा-१५३ (५), वर्धा-१३, भंडारा-६, गोंदिया-६, चंद्रपूर-१४, चंद्रपूर मनपा-९, गडचिरोली-६, इतर राज्य ११ (१).

#साहेब_माझाविठ्ठल: जितेंद्र आव्हाडांनी उलगडला शरद पवारांचा बारामती पॅटर्न

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २० लाख १६ हजार २३४ नमुन्यांपैकी ४ लाख ६५१ नमुने पॉझिटिव्ह (१९.८७ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ८८ हजार ६२३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४० हजार ७७७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६१ टक्के एवढा आहे.

१५ लाखांचे आश्वासन पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रदेश काँग्रेस तर्फे अभिनंदन : सचिन सावंत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!