Share

अर्थसंकल्प सादर होण्याअगोदर फुटला ; अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा -धनंजय मुंडे

Published On: 

मुंबई – अर्थसंकल्प विधिमंडळात सादर होण्याआधीच बाहेर पडला असून हा दोन्ही सभागृहाचा आणि सदस्यांचा अपमान आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात केली.

लोकशाहीला काळीमा फासणारी ही घटना आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा अर्थसंकल्प फोडण्यात आला आहे असा थेट आरोपही धनंजय मुंडे यांनी केला.

अर्थमंत्री सभागृहात अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरून अर्थसंकल्पातील गोष्टी ट्विट केल्या जात होत्या. या गोष्टी जाहिरातीसहीत ट्विटवर प्रसिद्ध केल्या जात होत्या. याचा अर्थ या अगोदरच अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांच्या सोशल मीडिया हँडल करणाऱ्या टीमच्या हाती लागला होता अशी माहिती धनंजय मुंडे यांनी सभागृहात पुराव्यानिशी सादर केली. यावेळी अर्थसंकल्प सादर करतानाच तो सोशल मिडियावर कसा येवू शकतो असा सवाल त्यांनी केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!