🕒 1 min read
नागपूर : राज्यात सध्या ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वाद सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत, असं मत स्पष्ट करुन राज्य सरकारला मोठा दणका दिला आहे. आरक्षणाचा मुद्दा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.
नागपूरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपवर टीका केली आहे. ‘घटनादुरुस्तीनंतर राज्यांचे सर्व अधिकार केंद्राकडे गेले. देशभरात यावर वादळ उठलं आणि नुकत्याच झालेल्या अधिवेशनात १२७वी घटनागदुरुस्ती केंद्र सरकारने केली. पुन्हा राज्यांचे घेतलेले अधिकार परत केले. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा दूर केली’, असं नाना पटोलेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
मागासवर्गात येण्याची इच्छा असलेल्या अनेक जातींना न्याय देता येईल. पण मराठा वा इतर मागास जातींना आरक्षण मिळू नये ही भाजपची मानसिकता आहे. भाजपची आरक्षण संपवण्याची मानसिकता आहे हे सातत्याने दिसत आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानेच निवडणुका पुढे ढकलण्यावर आक्षेप घेतल्यानंतर नाना पटोले यांनी थेट राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी याच्याविषयीच गंभीर आक्षेप घेत संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणावरून आता राज्यात नवी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.
२०१७ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या काळात देखील एका परिपत्रकावरून नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ दिल्या नव्हत्या. तेव्हाही राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणीच होते. आज देखील कुंभकोणीच महाधिवक्ता असताना सरकारच्या विरोधात कोर्टाचे निर्णय का येत आहेत?, असा सवाल आता नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने आरोग्यमंत्री टोपे संतापले!
- निवडणुकांना वेळ आहे, चर्चा करून ओबीसी समाजाला न्याय देऊ-बाळासाहेब थोरात
- शिवसेनेत अंतर्गत धुसफूस? संजय राऊतांच्या ‘त्या’ घोषणेमुळे शेकडो उमेदवारांचा जीव टांगणीला
- सुप्रीम कोर्टाचा निवडणुकीवर निकाल; प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘हे तर कायदेशीर दृष्ट्या अयोग्य’
- ‘मुख्यमंत्री कारवाई करणार की घरातच बसून फेसबूक लाईव्ह करणार आहेत?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
