औरंंगाबाद : वाढती वाहन चोरी, मंगळसूत्र चोरी या सारख्या घडणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मागील काही दिवसांपासून नाकाबंदी सुरु केली आहे. त्यात काही अंशी पोलिसांना यश आले असले तरी दुचाकी चोरीचे सत्र काही केल्या थांबत नाही आहे. त्यातच शहरातून पुन्हा दोन दुचाकी चोरीला गेल्या आहे.
शहर पोलिसांची नाकाबंदी भेदून दुचाकी चोरीला जात आहे. दुचाकी चोरीच्या घटना वाढल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून शहरातील मुख्य चौकात पोलिसांकडून नाकाबंदी केली जात आहे. असे असतानाही दुचाकी चोरीचे प्रमाण मात्र थांबायला तयार नाही.
शेख युनूस शेख लाल (वय २७, रा. इक्बालनगर, फकिरवाडी, हर्सूल) यांनी ३ पेâब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घरासमोर दुचाकी (एमएच-२०-डीएक्स-३९४८) उभी केली होती. चोराने हँडल लॉक तोडून मध्यरात्री त्यांची दुचाकी लांबवली.
तर महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भूषण बाळकृष्ण देवरे (वय २६, रा. एन-७, सिडको) हे १२ पेâब्रुवारी रोजी रात्री साडेसातच्या सुमारास एपीआय कॉर्नर येथील हॉटेल लोकसेवा येथे मित्राला भेटण्यासाठी गेले असता चोरट्यांनी त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-बीजी-२२०५) हॉटेलसमोरून लंपास केली. चोरट्याविरूध्द अनुक्रमे हर्सूल व एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जवळजवळ बाटलीबंद होत आलेले कोरोनाचे भूत पुन्हा बाहेर येते की, काय ?’
- कुमारस्वामींनंतर आता सिद्धारामैय्यांचा देखील राम मंदिराला देणगी देण्याला विरोध
- टूलकिट प्रकरणात नवनवीन नावांचा समावेश; अनिता लाल पोलिसांच्या रडारवर
- सलग नवव्या दिवशी इंधन दरवाढ कायम; सर्वसामान्य चिंतेत !
- इंग्लंड की कुटाई हो गई ! ‘या’ खेळाडूकडून टीम इंडियाच अभिनंदन !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

