🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : महाशिवआघाडीचे नेते आज राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार होते. मात्र ही भेट पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी एक पत्रक काढून ही भेट रद्द झाल्याचं जाहीर केलं आहे. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते हे निवडणूक आयोगकडे निवडणुकीचा खर्चाचा तपशील आणि प्रतिज्ञापत्र जमा करण्यासाठी आपापल्या मतदारसंघात व्यस्त आहेत. त्यामुळे ही भेट रद्द झाली असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे.
राष्ट्रपती राजवटीमुळे राज्यातील प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रशासनाला गतिमानता आणण्यासाठी राज्यपालांनी काही प्रयत्न करावेत याबाबत माहिती देण्यासाठी महाशिवआघाडीचे नेते भेटणार होते.राजकीय अस्थिरता असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा काहीशी ठप्प झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेच्या जीवनावर होताना दिसत आहे.
प्रशासन ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना मदत जाहीर होऊनही मदत मिळत नाहीये. कुठेतरी मुख्यमंत्री साह्याता निधीतून पेशंटला मदत मिळत नाहीये. त्यामुळे हे प्रशासन दुरुस्त करण्यासाठी आणि त्याला गतिमानता आणण्यासाठी तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते आज राज्यपालांची भेट घेणार आहेत, असे नवाब मलिक म्हणाले होते. आज दुपारी ३ वाजता महाशिवआघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेणार होते.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1195661230410616833?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1195659539015593985?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1195659389044002816?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
