Share

जाणून घ्या गांडुळखताचे फायदे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. तसेच खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत, कारण या झाडाची मुळे गांडुळखतामधील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळखत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्याने त्यासाठी पुढीलप्रमाणे छप्पर तयार करून घ्यावे.

तसेच ते तयार करताना रुंदी साडेपाच मीटर, मधील उंची ३ मीटर, बाजूची उंची १ मीटर आणि लांबी गरजेनुसार म्हणजे – उपलब्ध होणारे शेणखत व छप्परासाठी लागणारे साहित्य यानुसार- ५ ते २५ मीटर पर्यंत असावी. छप्परामध्ये १ मीटर रुंद व २० सें.मी. खोलीचे दोन समांतर चर खोदावेत.

गांडुळखताचे अनेक फायदे आहेत. जमिनीचा पोत सुधारतो. मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो. गांडुळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीची धूप कमी होते.

दरम्यान, बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते. जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो. गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात. गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत भरमसाठ वाढ होते. ओला कचरा व्यावास्तापन पण होते. मातीचा कस टिकून राहतो. या खतामुळे मातीमधील सूक्ष्मजीव टिकून राहतात.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1206118481877327872?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206117202027433985?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!