Share

जाणून घ्या पालक भाजी खाण्याचे फायदे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : पालकाच्या एक ग्लास ज्यूसमध्ये चवीनुसार काळे मीठ टाकून सेवन केल्यास दम आणि श्वासाच्या आजारामध्ये लाभ होईल. ताज्या पालकाचा रस दररोज पिल्यास स्मरणशक्ती वाढते. यामध्ये आयोडीन असल्यामुळे मेंदूवरील ताण कमी होतो.

तसेच कावीळ झालेल्या रुग्णाला पालकाचा आणि कच्च्या पपईचा रस एकत्र दिल्यास आराम मिळेल. लो ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज पालकाच्या भाजीचे सेवन करावे. यामुळे रक्तर प्रवाह नियंत्रित राहण्यास मदत होते.

पालकामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच अमायनो असिड, प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, अ, ब व क जीवनसत्त्व, फॉलिक असिड भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार पालक ही शितल, मूत्रल, सारक, वायुकारक, पचण्यास जड, पित्तशामक, रोचक व वेदनाहारी आहे.

या सर्व गुणधर्मामुळे पालक ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे व सर्व आजारांमध्ये पथ्यकर अशी भाजी आहे. पालकामध्ये रक्तशोधक गुणधर्म असल्यामुळे यकृताचे विकार, कावीळ, पित्तविकार यामध्ये उपयुक्त आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1199606035041808386?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1199599064569925632?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!