औरंगाबाद : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. या कोरोनामुळे अनेक नागरिक आज आपल्या घरापासून लांब आहेत. तर काहीजण अडकून पडली आहेत. हा कठीण काळ केव्हा संपेल याची कोणालाचं कल्पना नसल्याने घरा बाहेर अडकलेले अनेकजण आज बेचैन आहेत. तर दुसरीकडे काहीजण जवळ असून देखील आपल्या कुटुंबाला , जवळच्या माणसाला भेटू शकत नाहीयेत. त्यात कोरोनामुळे अनेकांची ताटातूट झाली आहे. तर अनेक लहानमुलं म्हणजेच नुकतेच जन्माला आलेली बाळंं देखील आईपासून दुरावली आहेत.
अशीच एक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर आईची कोरोना चाचणी सकारात्मक आल्याने नुकत्याच जन्मलेल्या बबाळाला आईपासून लांब ठेवण्यात आले आहे. मात्र या दोघींमधला दुरावा तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी झाला आहे. आईने आपल्या बाळाची भेट ही व्हिडीओ कॉलद्वारे घेतली आहे. याबाबतचे वृत्त BCC मराठीने प्रसिद्ध केले आहे.
या संपूर्ण प्रसंगाबाबत औरंगाबाद जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी बोलताना म्हणाले की, आईला कोरोना झाल्यामुळे मुलीला तिच्यापासून लांब ठेवण्यात आलं आहे. आई आणि बाळ दोघंही वेगवेगळ्या कक्षात आहेत. पण, आईची आपल्या मुलीला पाहायची खूप इच्छा होती. ही भेट घडवण्यासाठी आम्ही व्हीडिओ कॉलिंगची मदत घेतली. व्हीडिओ कॉलद्वारे आईला पहिल्यांदा आपल्या मुलीला पाहता आलं.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, आईने मुलीला पहिल्यांदा पाहिल्यानंतर तिचे डोळे भरून आले होते. मुलीला कधी एकदा भेटते अशी आईची अवस्था आहे. मात्र, कोरोनाग्रस्त असल्याने मुलीला तिच्याजवळ पाठवण्यात येत नाही. तसेच मुलीनेही व्हिडीओ कॉलिंगवर आईला उत्तम प्रतिसाद दिला.
‘या’ कायद्याचं पालन केलं नाही तर, कायद्यापलीकडे कोणालाही क्षमा केली जाणार नाही । Jitendra Awhad |
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

