मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने नागरी अर्बन बँकांवर नव्याने बंधने आणली आहेत. नाबार्डचं बंधन होतं ते सगळ्यांना मान्य होतं परंतु जाणीवपूर्वक कायद्यात दुरुस्त्या करुन केंद्रसरकारने त्यांच्यावर अंकुश निर्माण केला आहे त्यामुळे या जाचातून केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा सहकार क्षेत्राला सोडवतील असा विश्वास व्यक्त करतानाच अमित शहा यांच्या नेमणूकीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्वागत केले आहे.
दरम्यान या देशातील सर्व बँकींग व्यवसायावर अन्याय होतोय. त्यासाठी पवारसाहेब यासंदर्भात एक – दोन दिवसात महाराष्ट्रातील आणि देशातील बँकींग सेक्टरला व सहकार सेक्टरला कसं संकटात आणलेलं आहे हे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणार आहेत असेही जयंत पाटील यांनी सांगितले. गुजरात आणि महाराष्ट्राचा सहकार याच्यात फारसा फरक नाही. अमित शहा यांच्या नेमणूकीमुळे सहकार चळवळ वाढायला मदत होईल असेही जयंत पाटील म्हणाले.
गुजरात व महाराष्ट्रात सहकार आहे. गुजरातचा सहकार आहे जो अमित शहा एक बँक चालवत होते अशी माझी माहिती आहे. नोटबंदीच्या काळात जास्त नोटा एक्स्चेंज करण्यात आल्या त्यामुळे त्यांच्या बँकेचे नाव सर्वात पुढे आले होते. त्यामुळे अमित शहा यांना सहकाराचा जास्त अनुभव आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
आज रिझर्व्ह बॅंकेने नागरी अर्बन बँकांवर बंधने घातली आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर बंधने घालतेय. त्यांची स्वायत्तता धोक्यात आणलेली आहे. या सगळ्यातून अमित शहा या सेक्टरला सोडवतील असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
- ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने एकनाथ खडसे यांची चौकशी सुरू आहे – नवाब मलिक
- ‘राज्यात मंजूर पोलिस ठाणी व कर्मचारी वसाहतींचे बांधकाम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा’
- लातूरमध्ये राष्ट्रवादीचा धमाका; भाजप आणि कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकारी लावले गळाला
- वंचित बहुजन आघाडीपासून प्रकाश आंबेडकर काही काळ दूर; तर प्रभारी अध्यक्ष…
- ‘धर्मेंद्र, पाहा साहेबांनी डोळे मिटले’ ; दिलीप कुमार यांचे पार्थिव पाहून खचल्या सायरा बानो


