Share

औरंगाबाद कचराप्रश्नी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा स्थगन प्रस्ताव

Published On: 

मुंबई: औरंगाबादमध्ये कचरा प्रश्न प्रकरणी जनतेने आंदोलन केल्यानंतर पोलीसांनी कायदा हातात घेवून लोकांना मारहाण केली. तरी त्यांच्यावर सरकार कारवाई करत नाही. गणवेश घालून पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडले, गाड्या फोडल्या, महिला-मुलांना अमानुष मारहाण केली. पोलीसांनी केलेल्या या राडयाचे व्हिडिओ वायरल झालेले आहेत. यावर सरकार काय कारवाई करणार यासाठी २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडून सभागृहात चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

स्थगन प्रस्तावावर चर्चा होत नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे, आमदार सतिष चव्हाण आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी सरकारने निवेदन करुन ९७ अन्वये चर्चा करण्याची मागणी केली. या मागणीनंतर सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादचे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवले असून पोलिस आयुक्तांच्या चौकशीसाठी एसीएस होम आणि डीजी यांची समिती स्थापन करण्याची घोषणा केली

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!