Share

८० वर्षांचे आजोबा रुग्णालयातून झाले बेपत्ता, बोरिवली स्टेशनवर मिळाले अश्या अवस्थेत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक झपाट्याने वाढ होत आहे. मुंबई शहरात राज्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून तेथील परिस्थिती बिकट बनत आहे. अशात कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातून गायब झालेल्या एका कोरोनाग्रस्तांचा मृतदेह बोरिवली स्थानकात सापडल्याने एकाच खळबळ उडाली आहे.

अटींसह लॉकडाऊन मध्ये असलेली शिथिलता म्हणजे मोकळीक नाही – बाळासाहेब थोरात

80 वर्षीय आजोबांवर कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु होते. काल पहाटेपासून 80 वर्षीय आजोबा बेपत्ता होते. आज अखेर शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता 80 वर्षीय आजोबांचा बोरिवली स्टेशनला मृतदेह सापडला. पालिका रुग्णालयांची सुरक्षा व्यवस्था वा-यावर असल्याचे यातून समोर आले आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे आजोबांचा जीव गेल्याचा नातेवाईकांकडून आरोप करण्यात आला आहे. मुंबईत पालिकेच्या रुग्णालयांचा भोंगळ कारभार देखील यानिमित्ताने समोर आला आहे.

दिलासादायक : राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के

दरम्यान,महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राने चीनलाही मागे टाकले आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ८८ हजार ५२८ इतकी झाली असून आतापर्यंत ३ हजार १६९ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतही रुग्णांची संख्या ५० हजारांवर पोहचली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!