Share

अटींसह लॉकडाऊन मध्ये असलेली शिथिलता म्हणजे मोकळीक नाही – बाळासाहेब थोरात

Published On: 

मुंबई : कोरोनाचे संकट संपलेले नाही. अटींसह लॉकडाऊन मध्ये असलेली शिथिलता म्हणजे मोकळीक नाही. प्रशासनाने ठरवून दिलेले नियम आणि स्वयंशिस्त ही स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे असे परखड मत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, मिशेन बिगेन अंतर्गत राज्यात तब्बल ७५ दिवसांनी आजपासून खाजगी कार्यालये १० टक्के कर्मचारी उपस्थितीत सुरू होत आहेत. तर शासकीय कार्यालयातील उपस्थितीही आजपासून वाढणार आहे. दुसरीकडे विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळा शिक्षणासाठी बंदच राहणार आहेत. मात्र उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी आणि ऑनलाईन शिक्षणासाठी शाळा आजपासून सुरू होणार आहेत.

‘तू राऊत कडे लक्ष देऊ नकोस; आपल्याला रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही’ – चित्रा वाघ

तर मुंबईत बेस्टसेवाही आजपासून सुरू होतेय. आजपासून वृत्तपत्रांचे वितरणही सुरू होणार आहे. ज्या खाजगी कार्यालयात १० किंवा त्यापेक्षा कमी कर्मचारी असतील त्या कार्यालयात सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या परवानगी देण्यात आली आहे. ज्या कार्यालयांमध्ये १० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात तिथे १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीस परवानगी आहे. उरलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्य सरकारने खासगी ऑफिस सुरू करायला परवानगी दिली आहे. कामाच्या ठिकाणी सगळी जबाबदारी घेण्याच्या सूचनाही सरकारने केल्या आहेत. याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना आठवड्यातला एक दिवस कामावर उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे. एकही दिवस कामावर हजर न राहणाऱ्या सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा संपूर्ण आठवड्याचा पगार कापला जाईल, असा इशारा सरकारने आधीच दिला आहे.

कोकणवासियांना सर्व ती मदत करणार, 14 ट्रक मदतसामुग्री रवाना : देवेंद्र फडणवीस

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!