रायगड : निसर्ग या चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे. या नुकसानाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज आणि उद्या कोकण दौऱ्यावर आहेत. काजू, फोफळी, आंबा, आणि नारळाच्या बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे या भागातील नुकसानग्रस्तांकडून मदतीची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर येथील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत.
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून आढावा घेतला जात असून पाहणीसाठी कोकण दौऱ्यावर पोहोचले आहेत. शरद पवार यांनी सर्वात आधी रायगड येथील माणगाव येथे पोहोचून परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आणि पालकमंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या. यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून शरद पवारांना परिस्थिती जाणून घेतली.
शरद पवार दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. ९ जूनला रायगड आणि १० जून रत्नागिरी जिल्ह्यातील भागाची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत.
शरद पवार आज माणगाव, म्हसळा, दिवेआगार, श्रीवर्धन येथील दौरा केल्यानंतर ४ वाजता श्रीवर्धन येथे आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता हरिहरेश्वर आणि नंतर ६ वाजता बागमांडला मार्गे दापोलीकडे रवाना होणार आहेत.
धक्कादायक : शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू
दापोली येथे शरद पवार मुक्काम करणार आहेत. दिनांक १० जून रोजी रत्नागिरी जिल्हा दौरा असून सुरुवातीला दापोली येथील नुकसानीची पाहणी करणार आहेत. निसर्ग या चक्रीवादळाचा तडाखा हा सर्वाधिक बसला तो रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला. अनेक शेतकऱ्यांचं, आंबा उत्पादकांचं मोठं नुकसान झालं आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोकण दौरा केला. १०० कोटींची तातडीची मदत त्यांनी जाहीर केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
