टीम महाराष्ट्र देशा – कोरोनामुळे सध्या लॉक डाऊन आहे. या काळात मनोरंजन क्षेत्रातील सेलीब्रीटी लोकांशी सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. असाच संवाद आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पिंपरी चिंचवडच्या फेसबुक पेजवर आयोजित करण्यात आला होता. या फेसबुक लाईव्हवर आज लेखक, अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी लोकांशी संवाद साधला.
या संवादात प्रवीण यांनी आपली राजकीय विचारसरणी, आपली मतं तसेच विविध राजकीय व्यक्तींबद्दल आपला अनुभवही व्यक्त केले. संवादात सहभागी झालेल्यांच्या प्रश्नांचीही उत्तर त्यांनी यावेळी दिली.
तसेच सर्वांनी कोरोनाच्या काळात काळजी घ्या आणि स्वताची रोगप्रतिकारक शक्ती वाढवा असही त्यांनी आवाहन केलं आहे.
कोथरूडमधून लढण्यास राष्ट्रवादीकडून होता प्रस्ताव –
मला निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादीच्या मुख्य माणसाकडून विचारणा झाली होती पण ज्यांच्या विरोधात निवडणूक लढायची होती ते माझ्या विचारसरणीचे अर्थात संघाचे चंद्रकांत दादा होते म्हणून मी नकार दिला. मी राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा यांच्याशी ८ मिनिट बोललो त्यांचा अभ्यास बोलण्याची पद्धत मला भावली.
असं खुलासा ABVP पिंपरी चिंचवड च्या फेसबुक पेजवर बोलताना मराठीतील नामवंत अभिनेते आणि लेखक प्रवीण तरडे यांनी केला आहे.
https://www.facebook.com/ABVPpimpariChinchwad/videos/911657342612453/?v=911657342612453
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

