🕒 1 min read
मुक्ताईनगर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या समर्थकांचा पक्ष सोडून योग्य निर्णय घ्यावा, अशा मागणीचा सूर वाढत आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांनी खडसेंची भेट घेतल्यानंतर खडसेंच्या पक्षप्रवेशावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात होतं. एकनाथ खडसेंसाठी मंत्रिपद व आमदारकी यासाठी चाचपणी देखील पूर्ण झाली असून लवकरच खडसे आपल्या सर्मथकांसह राष्ट्रवादी प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आलं होत. मात्र खडसेंनी नुकतंच पुन्हा एकदा पक्ष बदलावर हुलकावणी दिली होती.
आता, घटस्थापनेचा मुहूर्त हुकला असला तरी या नवरात्रीच्या दिवसातच खडसे सीमोल्लंघन करणार या वृत्ताला सद्या मुक्ताईनगरमध्ये झळकलेल्या बॅनर्समुळे अधिक बळ मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये येत्या २२ तारखेला खडसे भाजपला अखेरचा राम राम करून राष्ट्रवादीमध्ये अधिकृतरित्या जाणार असल्याचे त्यांच्या खास समर्थकांनी सांगितले आहे. मुंबईला जाण्यासाठी तयारी करा असा आदेश देखील दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी बॅनरवरुन कमळ गायब केलं आहे. खडसेंच्या मुक्ताईनगरात समर्थकांनी बॅनरबाजीला सुरुवात केली आहे. “नाथाभाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण” असे बॅनर समर्थकांनी झळकावले आहेत. त्यामुळे गावागावात पुन्हा प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं असलं तरी यासंदर्भात एकनाथ खडसेंनी मात्र अजून कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
महत्वाच्या बातम्या-
- कोंबडा आरवला नाही तरी सकाळ व्हायची थांबत नाही,नवाब मलिक यांची जोरदार टीका
- सणासुदीच्या दिवसांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांसाठी चित्रपटांची मेजवानी…
- कमलनाथ कोण आहेत याची पर्वा नाही, त्यांचं विधान दुर्दैवी; राहुल गांधींनी केली कानउघडणी
- तेजस्विनीने धारण केलं ‘दुर्गे’च रूप पहा फोटो
- कोविड पार्श्वभूमीवर यंदाच्या हज यात्रेवर अनिश्चिततेचे ढग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
