🕒 1 min read
मुंबई : जिल्ह्यातील परतेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आणि ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teacher Award) विजेते रणजित डिसले यांना अमेरिकेत पीएच. डी. करण्यासाठी जाण्यापासून रोखले जात असल्याचा गंभीर आरोप डिसले गुरुजी यांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विट करत शिक्षण विभागाने त्यांच्याकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप केला होता. तसेच डिसले गुरुजी यांची रजा मंजूर करण्याची मागणी रुपाली पाटील यांनी केली होती. अखेर डिसले गुरुजी यांची रजा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मंजूर केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यावर रुपाली पाटील यांनी वर्षा गायकवाड यांचे आभार मानले आहेत. तसेच डिसले गुरुजी यांचे अभिनंदन केले आहे.
आभार @VarshaEGaikwad अभिनंदन @ranjitdisale
— Rupali patil thombare (@Rupalispeak) January 22, 2022
याप्रकरणी स्वत: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी लक्ष घातले आहे. तसेच, वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन डिसले गुरुजींच्या विदेशावारी शिष्यवृत्तीसाठीच्या रजेचा अर्ज मंजूर करण्याचेही त्यांनी निर्देश दिले आहेत. सोलापूरच्या परितेवाडी जी.प. शाळेतील शिक्षक रणजित डिसलेजी यांनी उच्च शिक्षणासंदर्भात दिलेल्या अर्जाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा करून हा अर्ज मंजूर करण्यास सांगितले आहे, असे ट्विट वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
दरम्यान, डिसले गुरुजी यांना पीएच.डी. साठीची रजा शिक्षणाधिकाऱ्यांनी नाकारल्याचे समोर आले होते. एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार ‘संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनी डिसले गुरुजी यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे नाव उंचावण्यासाठी काय केले? मागील तीन वर्षात त्यांनी शाळेसाठी काय केले? याचा शोध घेण्यासाठी त्यांच्या कामाची फाईल सादर करण्यास संबंधित गटशिक्षण अधिकाऱ्याला सांगितले होते. डिसले गुरुजींनी ग्लोबल टीचर पुरस्कार मिळविला, ही बाब अभिमानास्पद आहे; पण त्यांच्या या कर्तृत्वाचा परितेवाडी शाळेला काय उपयोग झाला, असा सवाल केला होता. त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी इतकी मोठी रजा देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान करणे परवडणारे नाही’ असं शिक्षणाधिकारी म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांची मोठी घोषणा; नाशिक विभागाला ३४६ कोटींचा वाढीव निधी मंजूर
- …त्यामुळे प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश झाला नाही- प्रियंका गांधी
- “गोव्यातील भाजपमध्ये फुटताय बंडाळीचे फटाके”, संजय राऊतांचे टीकास्त्र
- अभिमानास्पद! जम्मू काश्मीरातील मच्छल खोऱ्यात छत्रपती शिवरायांची मूर्तीस्थापना
- “काँग्रेसच्या आत्मविश्वासाचा फुगा गोव्यात इतका फुगला की त्यांना सत्यदर्शनाचे वावडे झाले”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
