ठाणे : मुंबईच्या उपनगरातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तर आता ठाणे शहर आणि जिल्हा मिळून कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 500 च्या वर गेला आहे. ठाणे जिल्ह्यात 100 पेक्षा जास्त करोना बाधित क्षेत्र म्हणजेच प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घरीच रहा व सुरक्षित रहा, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यात 500हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ठाणे महानगरपालिका हद्दीत 161 एवढी कोरोनाबाधित रुग्ण आहेत. ठाणे मनपा पाठोपाठ मिरा भाईंदर मनपा हद्दीत 114 करोनाबाधित आढळले आहे तर केडीएमसी 97, नवी मुंबई मनपा 85, बदलापूर 16, ठाणे ग्रामीण 16, भिवंडी मनपा 6, अंबरनाथ 4 आणि उल्हासनगर 1 अशी करोनाबाधित रुग्णांची आकडेवारी आहे.
आतापर्यंत 1 हजार 786 जणांच्या कोविड 19 चाचणी निगेटिव्ह आल्या असून या संसर्दजन्य रोगामुळे ठाणे जिल्हयात 17 जंणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 96 रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात केली आहे.
दरम्यान ज्यातील संसर्गग्रस्तांचा आकडा 5 हजार 229 च्या घरात पोहचला, तर आतापर्यंत 251 रूग्णांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील विविध शहरांमध्ये 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
बाळासाहेबांच्या जिवलग ‘सामना’बद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

