Share

राज्यातले सरकार पाडण्यापेक्षा ; पेट्रोलचे भाव कमी करा : राहुल गांधी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सरचिटणीस व नेते खासदार राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना चांगलेच सुनावले आहे. राहुल गांधी म्हणाले की ”तुम्ही लोकशाही मार्गाने आलेले सरकार (मध्य प्रदेश) पाडण्यात गर्क असताना जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीत ३५ टक्क्यांची घट झाल्याचे लक्षात आले नसेल. आता पेट्रोलचे दर लिटरमागे साठ रुपयांपेक्षा कमी करुन तुम्ही आपल्या जनतेचा फायदा करुन द्याल का, असा खोचक सवाल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे.

मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार अडचणीत आले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थक आमदारांनीही राजीनामा दिला आहे. आता ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे. मध्य प्रदेशात ज्या घडामोडी घडल्या त्याच्या मागे भारतीय जनता पक्षच असल्याचा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी सरकारला सुनावले आहे.

दरम्यान , काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह सहा मंत्र्यांनी व २२ आमदारांनी नुकताच काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंततर मध्य प्रदेशमधील राजकीय नाट्य आता चांगलेच रंगात आले आहे.आज सिंधिया यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!