Share

कोरोना संकटात ठाकरे सरकारकडून कोणत्याही बदल्या न करण्याचा निर्णय

Published On: 

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासन अनेक उपाययोजना राबवत आहे. राज्यात लॉकडाऊन करण्यात आला असून आता जिल्हा पातळीवर पूर्ण लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे समोर येत आहे.

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या करण्यात येऊ नयेत असे आदेश सामान्य प्रशासन विभागानं काढले आहेत. सरकारच्या सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या दर ३ वर्षांनी केल्या जातात. मात्र सध्या कोरोना संकटामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांवर ताण आहे. त्यामुळे ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या न करण्याचा अध्यादेश काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील दीड महिना तरी रुटिन बदल्या होणार नाहीत.

मात्र आपत्कालीन बदल्या केल्या जाऊ शकतात. सेवानिवृत्तीमुळे रिक्त भरलेली पद भरणं, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील रिक्त पद भरणं, शासकीय कर्मचाऱ्यांच्या विरोधात गंभीर स्वरुपाची साधार तक्रार प्राप्त झाल्यामुळे बदली करणं असे निर्णय घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन वेळोवेळी याबद्दल पुढील आदेश काढले जाणार आहेत. अशी माहिती शासनाने जाहीर केलेल्या अध्यादेशामध्ये सांगितले आहे.

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जवळपास अर्धा महाराष्ट्र पूर्ण लॉकडाऊनच्या गर्तेत गेला आहे. १७ शहरांसह जिल्ह्यांमध्ये देखील पूर्ण लॉकडाऊन लावण्यात येत आहे. एकाबाजूला मुंबईसह महाराष्ट्राचं कौतुक केंद्रीय स्तरावर केलं जात असलं तरी ग्रामीण महाराष्ट्रासह काही शहरांमध्ये कोरोनाचा उद्रेक होत आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन कठोर पाऊल उचलत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!