मुंबई : मुंबई पश्चिम उपनगरात साकीनाका परिसरात घडलेल्या अत्यंत अमानूष प्रकाराने सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. यावरून विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून याला केवळ सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार आहे. यांना फक्त आपली खुर्ची सुरक्षित कशी ठेवता येईल याचीच काळजी लागून आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यात हे सपशेल अपयशी ठरले आहे’ अशी टीका त्यांनी केली.
भाजपा महिला आघाडीच्या वतीने साकीनाका घटनेतील विकृत नराधमांना तात्काळ कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित भगिनीला लवकर न्याय मिळावा यासाठी मुंबई भाजपा मोर्चाच्या वतीने पवई पोलिस स्टेशनच्या बाहेर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, ‘राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रतिनिधींनी सुद्धा घटनास्थळाला भेट दिली, त्यांनीही महाविकास आघाडी सरकारच्या महिला सुरक्षा व्यवस्थेबाबत नापसंती व्यक्त केली. राज्यातील महिलांप्रती राज्य सरकार कमालीचे असंवेदनशील असल्यामुळे गेली दोन वर्षे राज्य महिला आयोगावर नेमणुका सरकारने केल्या नाहीत. महिला आयोगावरील नेमणुकांची फाईल उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर ते सही करत नाहीत. यावरून महाविकास आघाडी सरकार महिला सुरक्षेबाबत किती गंभीर आहे, हे दिसून येते, अशी टीकाही दरेकर यांनी केली.
राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून याला केवळ सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार आहे. यांना फक्त आपली खुर्ची सुरक्षित कशी ठेवता येईल याचीच काळजी लागून आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यात हे सपशेल अपयशी ठरले आहेत. pic.twitter.com/uX7JEvGQXl
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) September 12, 2021
‘तुमचा प्राधान्यक्रम बदलला आहे. तुमचा प्राधान्यक्रम बदल्या, वाझे सारख्या प्रवृत्तींना पाठीशी घालणे. म्हणून आज आपलं स्कॉटलंडच्या तुलनेत असलेला पोलीस विभाग सरकारच्या नाकर्तेपणामुळे बदनाम होत आहे. पोलीस सक्षम आहेत. हिंमतबाज आहेत परंतु जसा राजा तशी प्रजा, तसंच जसं सरकार तसं पोलीस खातं आणि त्याचा प्रत्यय तर आज अशा भयानक घटनामधून दिसत असल्याचे दरेकरांनी सांगितले.
याशिवाय, तुमचे केवळ सरकार हेच प्राधान्य आहे का? शेवटी सरकार कशासाठी असते. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी, जर तुमच्या राज्यात महिला सुरक्षित नसतील, तर एकदिवस देखील हे सरकार जनता ठेवणार नाही, असा इशारा देखील प्रविण दरेकर यांनी यावेळी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पंचनामे न करता शेतकऱ्यांना तत्काळ व सरसकट मदत करा’, खा.चिखलीकरांची मागणी
- निवडणुकांना वेळ आहे, चर्चा करून ओबीसी समाजाला न्याय देऊ-बाळासाहेब थोरात
- शिवसेनेत अंतर्गत धुसफूस? संजय राऊतांच्या ‘त्या’ घोषणेमुळे शेकडो उमेदवारांचा जीव टांगणीला
- सुप्रीम कोर्टाचा निवडणुकीवर निकाल; प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘हे तर कायदेशीर दृष्ट्या अयोग्य’
- ‘मुख्यमंत्री कारवाई करणार की घरातच बसून फेसबूक लाईव्ह करणार आहेत?’

