🕒 1 min read
मुंबई : राज्यातलं ठाकरे सरकार हे नुसतं बोलबच्चन सरकार आहे. यांच्याकडून प्रत्येक वेळी फक्त केंद्राकडे बोट दाखवलं जात आहे. केंद्राकडेच बोट दाखवायचं असेल तर मंत्रालयही दिल्लीला हलवा, अशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे.
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. हातचं पीक गेल्यानं शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना अद्यापही मदत न मिळाल्याने त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. हे नुसतं बोलबच्चन सरकार आहे. प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवलं जात आहे. केंद्राकडेच बोट दाखवायचं असेल तर मंत्रालयही दिल्लीला हलवा, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
ठाकरे सरकार म्हणजे बोलीचा भात आणि बोलाची कडी… नुस्त बोलबच्चन. पंचनामे झाले आता पुढे काय?? आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्ज काढू सांगणारे ठाकरे सरकारचे मंत्री कुठे गेले?? प्रत्येक वेळेला केंद्राकडे बोट दाखवायचं असेल तर मंत्रालय पण दिल्लीला हलवा. pic.twitter.com/Q6X8eg85p9
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 30, 2020
निलेश राणे यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. ठाकरे सरकार म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी. नुसतं बोलबच्चन. पंचनामे झाले आता पुढे काय?? आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्ज काढू सांगणारे ठाकरे सरकारचे मंत्री कुठे गेले? प्रत्येक वेळेला केंद्राकडे बोट दाखवायचं असेल तर मंत्रालय पण दिल्लीला हलवा, अशी टीका त्यांनी केली आहे.
तसेच राणे यांनी शिवसेना कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरून सुद्धा सुनावलं होतं. ‘जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुरच्या, स्टेज लावा, आंदोलन करा, केसेस घ्या. तुमची किंमत नाही की तुम्हाला पक्ष आमदारकी देईल. एक वेळ येईल की एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील’, असं ट्विट करत निलेश राणेंनी खास आपल्या स्टाइलने शिवसेनेला सुनावले आहे.
जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुरच्या, स्टेज लावा, आंदोलन करा, केसेस घ्या. तुमची किंमत नाही की तुम्हाला पक्ष आमदारकी देईल. एक वेळ येईल की एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील. https://t.co/YTRXRG6Njr
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 30, 2020
महत्वाच्या बातम्या
- ‘बळीराजाला कायद्याच्या माध्यमातून उद्योगपतींचा गुलाम बनवण्याचा मोदी सरकारचा डाव आहे’
- मुंबईतील २५ अनुदानित कॉलेज बंद पाडण्यापासून वाचवा- कॉंग्रेस
- आपल्याला केवळ सक्षम भारत नकोय तर हरित भारत हवा – उपराष्ट्रपती
- अमेरिकेत जाण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या भारतीय आयटी व्यावसायिकांना येणार अडचण…
- शिवसेनेचे संपर्कमंत्री जाहीर; नगरच्या गडाखांकडे सांगली, सोलापूर तर मालेगावचे भुसे नगरला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

