🕒 1 min read
नवी दिल्ली: प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. आता सरकारनेही इलेक्ट्रिक कारच्या विक्रीला चालना देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा अधिक विचार करत आहेत.
इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराने हवेचे प्रदूषण टळणार आहे. भारत कच्चे तेल आणि नैसर्गिक वायुच्या गरजेसाठी ८० टक्के आयात करतो. त्यासाठी लागणाऱ्या विदेशी चलनाचे प्रमाण हे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराने कमी होऊ शकते.
या पार्श्वभूमीवर टेस्ला या प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन कंपनीने टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरवरुन रविवारी कंपनीच्या भारतातील योजनांबाबत माहिती दिली होती. तर केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराचे वेळोवेळी महत्त्व सांगितले आहे.
त्यांनतर आता प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्ला (Tesla) २०२१च्या सुरुवातीला भारतात आपल्या इलेक्ट्रिक कार्सची विक्री सुरु करणार आहे. टेस्ला ही ऐलन मस्क यांची कंपनी आहे. केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात ही घोषणा केली.
गडकरी म्हणाले, “अनेक भारतीय कंपन्या देखील इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी काम करत आहेत. या वाहनांच्या किंमती कमी असतील मात्र तांत्रिकदृष्ट्या ती आधुनिक असतील जशी टेस्लाची वाहनं आहेत. टेस्ला भारतात पहिल्यांदा विक्रीच्या माध्यमातून आपल्या व्यावसायाला सुरुवात करेल. टेस्लाच्या कार्सवर भारतीयांचा प्रतिसाद कसा असेल त्यावरुन नंतर भारतात या कार्सच्या जोडणी आणि निर्मितीवर विचार होणार आहे.”
कंपनी २०२१ मध्ये भारतात दाखल होईल. टेस्लाच्या कार्सचे चाहते अनेक काळापासून भारतात या कार्सच्या विक्रीला कधी सुरुवात होईल याची वाट पाहत होते. एलन मस्क यांचं म्हणणं आहे की, “भारतात कार निर्मितीसाठीच्या नियमावलीनुसार, ३० टक्के मटेरियल स्थानिक असायला हवं, यामुळेच टेस्लाला भारतीय बाजारात यायला उशीर झाला.”
टेस्लाच्या कारसाठी कंपनीने केवळ ऑनलाइन बुकिंगचाच पर्याय खुला ठेवला आहे. जानेवारी २०२१ पासून या कारच्या बुकिंगला सुरुवात होईल. त्यानंतर जूनपासून प्रत्यक्ष विक्रीला सुरुवात होणार आहे. टेस्ला ‘मॉडेल ३’ या इलेक्ट्रिक कारपासून भारतात सुरुवात करणार आहे.
मॉडेल ३ ही सेडान प्रकारातली कार असून ती ० ते १०० किमीप्रतितास इतका वेग केवळ ३.१ सेकंदात गाठू शकते. याची रेंज ५०० किमी पेक्षा अधिक आहे. चीनच्या शांघाय शहरातील प्रकल्पात ही कार तयार होणार असून त्यासाठी कंपनीने मोठी गुंतवणूक केली आहे. शांघायमधूनच ती भारतात निर्यात केली जाणार आहे. या कारची एक्स शोरुम किंमत ही सुमारे ५० लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ईडी पुढे आपले म्हणणे सादर करण्याऐवजी खा.राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन कांगावा केला’
- इच्छा असूनही युवराजला सय्यद मुश्ताक अली टी २० मध्ये संधी नाही
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वर्षाचा शेवट गोड! केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
- भारताला एक शक्तीशाली राष्ट्र म्हणून ओळख देण्यात काँग्रेसचे मोलाचे योगदान – बाळासाहेब थोरात
- नववर्ष स्वागताला ‘बसायचा प्लॅन’ करत असाल तर सावधान, ‘अशी’ असेल नियमावली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
