Share

दहावी-बारावी परिक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात; आशिष शेलार यांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – राज्यासह देशात कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्युने भयावह परिस्थिती निर्माण केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र कोरोणाची परिस्थिती पाहता या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता दहावी, बारावीची परिक्षांंच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात. कोविडची परिस्थिती आटोक्यात येताच योग्य वेळी दोन्ही पद्धतीने परिक्षा घ्याव्यात असे मत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी आज मांडले.राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या परिक्षांबाबत काय करावे? याबाबत आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार आशिष शेलार यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली.

यावेळी आमदार आशिष शेलार यांनी आपली भूमिका मांडतांना सांगितले की, कोविडची सध्याची भयावह स्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या आरोग्याची प्रथम काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच या सोबतच सरकारने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आरोग्याची सुध्दा काळजी करणे आवश्यक आहे.

त्यामुळे या स्थितीमध्ये परिक्षांच्या नियोजित तारखा पुढे ढकलण्यात याव्यात. तसेच पुन्हा आढावा बैठक घेऊन योग्य वेळी परीक्षा आँनलाईन व आँफलाईन पध्दतीने घ्याव्यात. आता शासनाने अधिक विलंब न करता निर्णय तातडीने जाहीर करणे आवश्यक आहे, जेणेकरून पालक व विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर होईल, असेही आमदार आशिष शेलार यांनी मंत्र्यांना सूचित केले.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!