मुंबई: राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही संवाद नाही. त्या तीन पक्षात कोणताही ताळमेळ नाही, त्यामुळे राज्यातील ‘ठाकरे’च्या नेतृत्त्वाखालील सरकार फार काळ टीकेल असं वाटत नाही, असा कयास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लावला आहे.
तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही. त्याबद्दल काही बोलणार नाही, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होत. याच वक्तव्यावरून आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व मंत्री सुभाष देसाई यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तरात मराठीतील एक म्हण बोलत टीका केली.
सुभाष देसाई यांनी, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलताना, शुभ बोल रे नाऱ्या म्हणीप्रमाणे काम चांगलं होत असेल तर चांगल्या शुभेच्छा द्या. चांगल्या निर्णयाचं स्वागत करा. अडचणी सगळीकडे आहेत. देशातील सगळी सरकारं अडचणी आहेत. त्यामुळं टीका करण्याऐवजी सूचना करा, सल्ला द्या, असं म्हणलं आहे.
…म्हणून शेतकऱ्यांनी नोंदणीकृतच कीटकनाशके, खते, पिक वाढ संजीवके वापरावीत
दरम्यान, राज ठाकरे म्हणाले, हे सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही, हे आधीपासून बोलतोय, माझी इच्छा नाही हे सरकार पडावं पण तीन पक्षाचे सरकार आहे, एकमेकांना विचारलं जात नाही, त्यामुळे हे टिकेल वाटत नाही, सरकारमधील पक्षांमध्ये विसंवाद आहे हे प्रखरतेने दिसून येते. यामुळे हे सरकार लवकर जाईल असं वाटते असं राज ठाकरे म्हणाले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाकीत वर्तवलं.
वीज मंडळाला 6 हजार कोटींचे अनुदान देऊन भरमसाठ वीज बिल प्रश्न सोडवा – भाजपा
कोरोनाच्या परिस्थितीत राज्य केंद्राकडे बोट दाखवतंय, केंद्र राज्यांकडे बोट दाखवतंय, पण लोकांना ह्याविषयी घेणं देणं नाही. लोकांची एकच अपेक्षा आहे की आम्हाला यातून सोडवा. कोरोनाचं संकट अभूतपूर्व आहे पण त्या काळात सरकारवर टीका करण्याची वेळ नव्हती. दोन्ही सरकारच्या चुका झाल्या पण ही वेळ राजकारण करण्याची नव्हती म्हणून विरोधी पक्षांनी जबाबदारीने वागायला हवं होतं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

