🕒 1 min read
नाशिक: शहरात गुन्हेगारीचं प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही. शहरात घडलेल्या हत्येच्या घटनेनं नाशिक शहर पुन्हा हादरलं आहे. सातपूर परिसरातील भाजप मंडळ अध्यक्ष अमोल इघे (Amol Eghe) यांची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजकीय पूर्ववैमनस्यातून हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
भाजप मंडळ अध्यक्ष अमोल इघे यांच्या निर्घृण हत्येनंतर भाजप आक्रमक झाली असल्याचे दिसत आहे. आक्रमक झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पोलीस ठाण्याबाहेर भाजप आमदार, पदाधिकारी यांचे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. भाजपच्या आमदार सीमा हिरे, प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण सावजी हे सुद्धा आंदोलनात सहभागी झाले आहेत. युनियनच्या वादातून अमोल इघे यांची हत्या झाल्याचा दावा आंदोलन करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
या हत्येनंतर आक्रमक झालेल्या भाजपने नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या दोन तीन महिनयांपासून नाशिककर चिंतेत आहेत. रोज सकाळी उठल्यावर एक हत्या झाल्याचं ऐकायला मिळतं. याचं यांना काहीही वाटत नाही. या शहरात सुपारी घेणाऱ्यांना अभय मिळालेलं आहे. या शहराचे पालकमंत्री आणि शहराचे पोलीस आयुक्त हे शहर अशांत करत आहेत, असा गंभीर आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार तर, स्टीव्ह स्मिथ?
- आडमुठेपणा धरुन बस बंद ठेवल्यास एसटी कर्मचाऱ्यांचेच नुकसान-अनिल परब
- …त्यामुळेच देशहित मागे पडत आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य
- फडणवीस-चंद्रकांत पाटलांची वरिष्ठांसोबत बैठक; पक्ष कार्यालयात पुन्हा खलबतं
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १९४८ सालच्या भाषणाची प्रत पंतप्रधान मोदींनी केली शेअर; म्हणाले…


