🕒 1 min read
नवी-दिल्ली : आज २६ नोव्हेंबरला भारतात संविधान दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. आजच्याच दिवशी १९४९ मध्ये भारतीय संविधान समितीने भारतीय राज्यघटनेचा अवलंब केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर(Dr.Babasaheb Ambedkar) यांच्या अध्यक्षतेखाली २६ जानेवारी १९५० ला भारतीय संविधानाची अंबलबजावणी करण्यात आली. जवळपास २ वर्ष ११ महिने आणि १७ दिवस आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली जगातील सर्वात मोठ्या संविधानावर काम करण्यात आले होते. दरम्यान, आज या भारतीय राज्यघटनेस ७१ वर्षे पूर्ण होत असून यानिमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९४८ सालच्या भाषणाची प्रत शेअर केली आहे.
Best wishes to our citizens on Constitution Day.
On this special day, sharing a part of Dr. Ambedkar’s speech
in the Constituent Assembly on 4th November 1948 in which he moved a motion for adoption of the Draft Constitution as settled by the Drafting Committee. pic.twitter.com/pviZNrKsGd— Narendra Modi (@narendramodi) November 26, 2021
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये या भाषणाच्या प्रतीचा फोटो शेअर केला असून ते म्हणाले आहेत की,’आपल्या नागरिकांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या खास दिवशी डॉ. आंबेडकरांच्या भाषणाचा काही भाग शेअर करत आहे. ४ नोव्हेंबर १९४८ रोजी संविधान सभेत त्यांनी मसुदा समितीपुढे संविधानाचा मसुदा स्वीकारण्याचा प्रस्ताव मांडला.’
दरम्यान, भारतीय राज्यघटनेचा मसुदा, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीकडून स्वीकारला गेला. या घटना समितीने १६६ दिवस काम केले. राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी दोन वर्षे अकरा महिने व अठरा दिवस एवढा कालावधी लागला. ‘घटना समितीने सुचविलेली भारतीय राज्यघटना संमत करावी.’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला एका ओळीचा प्रस्ताव, विस्तृत चर्चेअंती टाळ्यांच्या गजरात संमत केला गेला.
महत्वाच्या बातम्या:
- ‘अब की बार मोदी सरकार’ची आठवण करून देत शिवसेनेचा हल्लाबोल
- मागील सात वर्षांत झालेली इंधनाची जबर दरवाढ हेच महागाईच्या भरारीचे मुख्य कारण- संजय राऊत
- राजनाथ सिंह यांनी केला पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगींच्या ‘त्या’ फोटोचा खुलासा
- आज विज्ञानाचा आग्रह किंवा आस्था निर्माण करण्याची आत्यंतिक गरज- शरद पवार
- हा महाराष्ट्र आहे, इथं कार्यक्रमांमध्ये मराठीमध्येच सूत्रसंचालन करण्यात यावं- भगतसिंह कोश्यारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

