Share

इंदूर-मनमाड रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्यासाठी निविदा मंजूर : नितीन गडकरी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : इंदूर-मनमाड नवीन रेल्वे मार्गाचे सर्व अडथळे दूर झाले असून पहिल्या टप्प्यासाठी निविदा मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. येत्या चार वर्षात हा रेल्वे मार्ग पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय जहाज बांधणी मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पोर्ट रेल कनेक्टिव्हिटी कॉपोरेशन लि.च्या वतीने तसेच मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने 362 किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वे मार्ग उभारला जाणार आहे. या रेल्वे मार्गातील सर्व अडथळे दूर करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्याअंतर्गत विर ते नरडाणा सेक्शन मध्ये पांझरा नदीवरील मोठा पूल आणि त्यापुढील तीन पुलांसाठी रु.50 कोटींच्या निविदा मंजूर करण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या रेल्वे मार्गासाठी जवळपास सहा वर्षाचा कालावधी लागणार आहे. मात्र हे काम चार वर्षात पूर्ण करण्याच्या सूचना केल्या असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळेचे खासदार डॉ. सुभाष भामरे उपस्थित होते.

महाराष्ट्रातून 186 किलोमीटर रेल्वे मार्ग

वर्ष 2016 मध्ये मंजूर झालेल्या 362 किमी अंतराच्या इंदूर –मनमाड रेल्वे मार्गापैकी महाराष्ट्रातून 186 किमी रेल्वे मार्ग जाणार आहे. हा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग असून यावर मोठे 13 पूल तर 249 लहान पुलासह असे एकूण 595 रेल्वे पूल असणार आहे. या रेल्वे मार्गासाठी एकूण 2008 हेक्टर जमीन अधिग्रहण करण्यात येणार असून महाराष्ट्रातील 964 हेक्टर तर मध्य प्रदेशातील 1044 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे. या रेल्वे मार्गासाठी एकूण 8 हजार 574 कोटी 79 लाख रुपये खर्च अपेक्षित असून यातील प्रत्येकी 15 टक्के निधी हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकार इक्विटीच्या माध्यमातून भांडवल उभारणार आहे तर उर्वरित 70 टक्के निधी हा जेएनपीटी स्वत: व कर्ज घेऊन उभारणार आहे.

रेल्वे मार्गाच्या चुकीच्या सेर्वेक्षणाच्या विरोधात कुकाना येथील नागरिकांचे अमरण उपोषण

या नवीन रेल्वे मार्गामुळे मनमाड आणि इंदूर या औद्योगिक केंद्राचा विकास होऊन या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रेाजगार निर्मिती होणार आहे. तसेच उभय राज्यांतील रेल्वे मार्ग लगतच्या शेती आणि औद्योगिक क्षेत्राचा विकास होईल असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. या रेल्वे मार्गामुळे दिल्ली-चेनई व दिल्ली बेंग्लुरु हे रेल्वे मार्गाचे अंतर 325 किलोमीटरने कमी होणार असून यामुळे रेल्वे प्रवाशाचा फेरा वाचणार आहे. तसेच मुंबई-इंदूरचे अंतर दोनशे किलोमीटर ने कमी होईल. इंदूरहुन दर वर्षी 47 हजार कंटेनर मुंबईस्थित जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टला जातात. इंदूर –मनमाड रेल्वेमार्ग सुरु झाल्यावर मुंबई इंदूरचे अंतर 200 किमी ने कमी होईल त्यामुळे वाहतूक कोंडीही कमी होईल.

मनमाड-इंदूर’ रेल्वेमार्गाला अखेर मुहूर्त

संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केला सातत्याने प्रत्यक्ष पाठपुरावा

धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी इंदूर-मनमाड रेल्वे मार्गासाठी सातत्याने प्रत्यक्ष पाठपुरावा केला असून त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे गडकरी म्हणाले. या रेल्वे मार्गामुळे धुळे जिल्ह्यातील शेती आणि औद्योगिक क्षेत्राला गती येईल त्यामुळे मोठा रोजगार उपलब्ध होईल, असेही गडकरी म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!