पुणे : अमित शाहांच्या पायगुणाने सरकार जावं; असं नारायण राणे म्हणाले होते. अमित शाह सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेत असे वक्तव्य केले होते. त्यावर शिवसेनेने सामनातून उत्तर दिलं होतं. अमित शाह यांच्या पायगुणाने महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे सरकार जाईल, अशी स्वप्ने पाहणाऱ्यांविषयी काय बोलावे? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला होता.
अमित शाहांचा सिंधुदुर्ग दौरा पार पडल्यानंतर वैभववाडीमधील भाजपच्या ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे अमित शाहांच्या पायगुणाने नगरसेवक गेल्याची जोरदार चर्चा सुरूवात झाली आहे.
दरम्यान, यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. ‘अमितभाईंच्या पायगुणाने वैभववाडीतील 6 नगरसेवक गेले त्याचा काही संबंध नाही. अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार यायचं असेल तर येईल. मी काही भविष्यकार नाही’, असे पाटील म्हणाले. त्यांनी गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांची पिंपरी चिंचवडमध्ये सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आहे.
‘अमित भाई असं व्यक्तीमत्व आहे, भाजप हा पक्ष असा आहे कुणाला घाबरत नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही, जे बोलायचं ते छातीठोकपणे बोलतो. समोरच्याला टाकून बोलणं, लागून बोलणं अशी आमची संस्कृती नाही’, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- दुरावत चाललेल्या ओबीसी मतदारांना पुन्हा आपल्याकडे वळविण्याचे भाजपने पुन्हा सुरु केले प्रयत्न
- ‘तुम्ही ज्या नर्सरीत शिकता, पवार त्याचे संस्थापक अध्यक्ष’, राष्ट्रवादीकडून खोतांना प्रतिउत्तर
- मुंबईच्या तिरा कामतसाठी औषध आयात करण्यास केंद्राकडून कर माफ, देवेंद्र फडणवीसांच्या पाठपुराव्याला यश
- तुळजापुरात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी रोचकरीनंतर शेकापचे उपोषण
- फक्त गुलाम नबीच नव्हे तर पवार,कंगना,उदयनराजे यांच्यासह ‘या’ दिग्गजांना आठवलेंनी दिली आहे ऑफर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
