Share

तरुण भारत माहित नाही, असं म्हणणारे संजय राऊत ‘अधू दृष्टीचे’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : ‘तरुण भारत’ माहित नाही, असं म्हणणारे संजय राऊत ‘अधू दृष्टीचे’ आहेत, अशा शब्दात ‘तरुण भारत’च्या अग्रलेखातून पुन्हा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा समाचार घेण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील सत्ता संघर्षात आता भर पडली आहे ती शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ आणि रा. स्व. संघाचे मुखपत्र ‘तरुण भारत’या वृत्तपत्रांची.

” एका अग्रलेखावरुन एखादा माणूस इतका अस्वस्थ होईल, की महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्रांची नावंही विस्मरणात जातील, असं आम्हाला कधीही वाटलं नव्हतं. तरुण भारत माहिती नाही, असं सांगून एकप्रकारे आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं महाराष्ट्रासमोर प्रदर्शन करणाऱ्या स्वयंघोषित अनुभवी पत्रकाराचे अभिनंदनच करावे लागेल, असा टोमणाही राऊत यांना मारण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्राची जनता विक्रमाच्या रुपाने प्रश्न विचारत आहे आणि त्याची उत्तरं देणं सोडून आपलं अज्ञान प्रगट करण्याचं काम होत आहे. आता यांच्या 175 आमदारांच्या पाठिंब्यावर खुद्द शरद पवार यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे, असं म्हणत ‘तरुण भारत’मधून राऊतांच्या वक्तव्याची खिल्ली उडवण्यात आली आहे.”

दरम्यान,‘रोज अग्रलेख लिहिणं आणि नंतर ९ वाजता पत्रकार परिषद घेत फिरणं, बातम्या पेरणं यामध्ये आणि महाराष्ट्रासारख्या राज्याचा कारभार चालवून दाखवणं यामध्ये अंतर समजून घेण्याची ज्यांच्यात क्षमता नाही, त्यांच्याकडून ती अपेक्षा तरी कशी करायची?’अशी टीका तरुण भारत वृत्तपत्राच्या संपादकीय मधून शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आली होती. या टीकेला उत्तर देताना राऊतांनी ‘तरुण भारत’ नावाचं वृत्तपत्र आहे का? अशा शब्दात तरुण भारत ला टोला लगावला होता.

त्यावर तरुण भारतने पुन्हा एकदा संपादकीयमधून राऊतांना त्यांच्या जबाबदारीची आठवण करून देण्यात आली आहे. ”संपादक हा वाचकसंख्येचा लोकप्रतिनिधी असतो. त्यांची जनभावना टिपणे आणि ती सत्ताधाऱ्यांकडून पूर्ण करुन घेणे, हे संपादकांचे आद्यकर्तव्य असते, ” असं सांगत संजय राऊत यांना वृत्तपत्राच्या संपादकपदाच्या जबाबदारीचीही आठवण करुन देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1191614760988508161?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1191617009336762368?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!