टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन आहे. सरकारकडून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे परंतु रोजच्या रोज देशातील रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नागरिकांनी लॉक डाऊन गांभीर्याने घेऊन ते काटेकोरपणे पाळावे असं सरकार सांगत आहे.
परंतु नागरिक काही लॉक डाऊन गांभीर्याने घेताने दिसत नाही. असाच प्रकार आता तमिळनाडूमध्ये घडला आहे. तामिळनाडू पोलिसांनी जलिकट्टू खेळातील एका बैलाच्या अंत्यविधीला गेल्या प्रकरणी ३००० केसेस दाखल केल्या आहेत. ही घटना मदुराईतील एका गावात घडली असून १२ एप्रिल रोजी हा अंत्यविधी झालं होता. याबतच वृत्त ANI या वृत्त संस्थेने दिलं आहे.
याबाबतची माहिती मदुराईचे जिल्हाधिकारी टी जी विनय यांनी दिली आहे. त्यामुळे कोरोनाला अटकाव घालायचा असेल टर नागरिकांनी कायद्याचं आणि लॉक डाऊनच तंतोतन पालन करण्याची गरज आहे.
https://twitter.com/ANI/status/1250465970230984704
हेही पहा –
https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

