Share

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ‘या’ राज्यातील लॉकडाऊन 31 ऑक्टोबर पर्यंत वाढवले

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- तामिळनाडू राज्यातील कोविड टाळेबंदी 31 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या सूचनेनंतर राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव तसंच, गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात कोविड-19 ची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. लोकांनी सण आणि उत्सव आपापल्या घरी साजरे करण्याचं आणि कोविड नियमांचं पालन करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केलं आहे. तमिळनाडू सरकारच्या आणखी एका नियमानुसार विविध निमित्तानं नेते इत्यादींच्या पुतळ्यांना पुष्पहार घालण्याची परवानगी केवळ जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सध्या प्रमाणेच एक दिवसा आड शाळा सुरू ठेवता येणार आहेत.

दरम्यान, देशात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात 34 हजार 973 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 37 हजार 681 रुग्ण कोरोनामुक्त झाले. या कालावधीत कोविड-19 मुळे 260 मृत्युंची नोंद झाली. सध्या देशभरात 3 लाख 90 हजार 646 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.

देशात रुग्ण बरे होण्याचा दर 97. 49 शतांश टक्के झाला आहे. कोविड-19 मुळं देशात आजपर्यंत 4 लाख 42 हजार 9 जण दगावले आहेत. कोरोना रुग्णांच्या मृत्यू होण्याचा दर 1.33 शतांश टक्के आहे. दिवसभरात काल 67 लाखांहून अधिक कोरोना प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या. आतापर्यंत लसींच्या 72 कोटी 37 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!