Share

दिल्लीत आंदोलनाच्या नावाखाली तमाशा सुरू, पाशा पटेल यांची टीका

Published On: 

कोल्हापूर : नवी दिल्ली येथे दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारची चर्चेची भूमिका तपासून बघा. सुरुवातीला दिल्लीतील शेतकरी एक मागणी घेऊन गेला. यांच्या अपेक्षा वाढल्या. काही दिवसांनी चार मागण्या घेऊन गेले, त्यातील तीन मागण्या मान्य केल्या. तरीदेखील विरोध सुरू आहे, याचे गमक कळले नाही, हे आंदोलन शेतकऱ्यांचे राहिले नाही, राजकीय आहे. आंदोलनाच्या नावाखाली तमाशा सुरू आहे, अशी टीका राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिल्लीतील आंदोलनावर केली.

कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकरी आंदोलनाच्या राजकारणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या आंदोलनाची मोठी गंमत आहे. शेतकऱ्यांना सरकारचे मत ऐकायचे नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन म्हणजे पालथ्या घागरीवर पाणी, असा प्रकार सुरू आहे. सरकार सर्व मागण्यांवर चर्चा करायला तयार असताना शेतकऱ्यांनी आडमुठे धोरण ठेवले आहे. त्यांना प्रश्न सोडवून घ्यायचे नाहीत, त्यांना तमाशा करण्यात रस आहे, असा टोला पाशा पटेल यांनी लगावला.

शेतकऱ्यांचे नेते शरद पवार आहेत. ते राज्यसभेचे सदस्य आहेत. या कायद्यावर राज्यसभेत चर्चा झाली. त्या वेळी शरद पवार राज्यसभेत कुठे होते, असा सवाल पाशा पटेल यांनी केला. कृषी कायद्यावरुन सध्या राजकारण सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या मागे शेतकरी आहेत का?, सदाभाऊ खोत फुटले नसते तर ते भाजपसोबत असते. तुमचा माणूस फुटला म्हणून भाजप बेईमान कसा ? अशी विचारणाही पटेल यांनी केली. राजू शेट्टी म्हणजे सेना गेलेले पती असा टोलाही त्यांनी लगाविला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!