🕒 1 min read
नवी दिल्ली- जगभरात कोरोनाच्या समूळ नयनाट करण्यासाठी अमेरिकेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम वेगाने राबवण्यात येत आहे मात्र अमेरिकेतील सरकारला ही मोहीम अधिक वेगाने करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. यातूनच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आता कोरोना लस घ्या आणि मोफत बिअरचा आस्वाद घ्या अशी ऑफर अमेरिकन नागरिकांना दिली आहे.
अमेरिकेत 4 जुलैच्या सुट्टीपर्यंत 70 टक्के प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण करण्यासाठी अमेरिकन प्रशासनाचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. ‘कोरोना लसीचा डोस घ्या आणि बिअर मिळवा’ अशी घोषणाच राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी आपल्या भाषणात केली आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनापर्यंत उद्दिष्टय़ पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने लसीकरण मोहिमेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
दरम्यान, अमेरिकेनंतर भारत हा दुसरा देश आहे ज्याने लसीकरणाचा एक मोठा टप्पा टप्पा ओलांडला आहे. परंतु जर आपण लोकसंख्येच्या आधारे विचार केला तर आपण बऱ्याच देशांच्या मागे असल्याचं आकडेवारी सांगते. टक्केवारीनुसार पाहिलं तर भारतात लसीकरणाचा वेग अत्यंत कमी आहे. तथापि, आपल्या देशात लसीकरणाचा वेग जूनपासून वाढण्याची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार पवार यांनी मराठा समाजाच्या बाजूने बोलावे; नारायण राणेंची मागणी
- ‘तुम्हीच ओबीसींचे मसिहा आहात, असे भासवू नका’, मंत्री वडेट्टीवारांचा भाजपला टोला
- बँकांनी शेतकऱ्यांना पिककर्ज वेळेत उपलब्ध करून द्यावे – उद्धव ठाकरे
- ‘अल्लाह समोर रडून माफी मागितल्यास कोरोनाचे हे संकट नष्ट होईल’
- ‘तळागळातील जनतेच्या कल्याणासाठी कार्य करणे हीच गोपीनाथजींना श्रध्दांजली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
