औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवरील आरोप वाढतच आहे. या आरोपांमुळे दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत. तर आणखी एक मंत्री लवकरच राजीनामा देईल असा दावा भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. त्यात आता आणखी एका मंत्र्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर शेत बळकवण्याचा आरोप एका महिलेने केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मुजोर मंत्र्यांची दखल घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या आणि संजीवनी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा विशाखा गायकवाड यांनी केली आहे.
या प्रकरणी आशाबाई धोंडू बोराडे यांनी अब्दुल सत्तारांवर आरोप केले आहेत. सदरील महिलेने केलेल्या दाव्यानुसार सिल्लोड तालुक्यातील उंडणगावमध्ये वडिलांची शेती होती. वडिलांच्या मृत्यूनंतर या शेतीमध्ये महिलेने आपल्या भावाला हिस्सा मागितला होता. तशी न्यायालयीन लढाई देखील लढली होती. मात्र, न्यायालयाच्या निकालानंतर भावाचा मृत्यू झाला. भावाच्या मृत्यूनंतर भावजयीने परस्पर ही जमीन कवडीमोल किंमतीमध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना विक्री केली, असा दावा या महिलेने पत्रकार परिषदेत केला आहे. आपली शेती सत्तार यांच्या कार्यकर्त्यांच्या नावावर विकत घेण्यात आल्याचा आरोप या महिलेले केला आहे.
काही महिन्यांपूर्वी मंत्रालयासमोर या महिलेने अंगावरील साडी काढत सत्तार यांच्या विरोधात आंदोलन केले होते. एक महिला आपल्यावरील अन्यायाविरोधात या पातळीवर जावूनही सरकार दखल घेत नसल्याचा आरोप विशाखा गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेवून सदरील महिलेला न्याय देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आघाडीतील तणाव निवळण्यासाठी पवारांच्या दरबारात काँग्रेससोबत वाटाघाटी ?
- ‘शिवसेनेलाच आता युतीची गरज असेल’; निलेश राणेंचा टोला
- पुणेकरांना दिलासा : कोरोनामुक्तांच्या आकड्यात वाढ ! आजही सक्रिय रुग्णांमध्ये झाली घट
- नाना पटोलेंसारख्या जबाबदार व्यक्तीने बेताल वक्तव्य करू नये; सुनिल शेळकेंनी सुनावलं
- ‘पडळकरांनी पात्रता ओळखून भाष्य करावं, तोंडाला येईल ते बोलून स्वतःचा पचका करून घेऊ नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

