पुणे : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यात होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती. ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पुढे ढकलल्यामुळे विधान परिषेदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पुण्यात आंदोलन सुरु केले.
पुण्यासह नागपूर, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, नाशिक,अहमदनगर येथे विध्यार्थ्यांच जोरदार आंदोलन चालू आहे. MPSC चे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पुणे शहरातील नवी पेठेमध्ये मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी रास्तारोको सुरू केला आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रवक्ता बालाजी गाढे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुले पत्र लिहले आहे. ‘कोरोना मुळे २०२० मध्ये अनेक वेळा परीक्षेच्या तारखेत बदल झाला त्यामुळे विद्यार्थ्यांना सतत अनिश्चिततेल सामोरे जावे लागतेय.
अनेक वर्षांपासून स्पर्धापरीक्षा करणारे विद्यार्थी आर्थिक व मानसिक त्रासातून जात आहेत. परीक्षा झालीच पाहिजे आणि ती काळाची गरज आहे. १४ मार्च २०२१ ला ठरलेली राज्यसेवेची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय रद्द करून परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या भावनांचा सन्मान करावा’ अशी मागणी त्यांनी या पत्रातून मुख्यमंत्र्यांना केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- #MPSC : मला अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय घेतला गेलाय,याबाबत चौकशी करण्यात येईल – वडेट्टीवार
- #MPSC : सरकार काय गांजा पिऊन बसलं आहे का? : गोपीचंद पडळकर
- सहकार आयुक्तांचा पंकजा मुंडेंना दणका, दिला ‘हा’ मोठा आदेश
- MPSCने तारखा घोषित करताना सरकारला विश्वासात घेतलं नाही : वडेट्टीवार
- एमपीएससीच्या परीक्षा रद्द केल्याने औरंगाबादेत विद्यार्थ्यांचा राडा


