पुणे : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर अगदी संकटकाळात स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉक्टर ,नर्स आणि रुग्णालयातील कर्मचारी अत्यावशक सेवा देत आहेत.पण काल रात्री आठच्या सुमारास मालेगाव येथे एम आय एम चे स्थानिक आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल व त्यांच्या २५ – ३० कार्यकर्त्यांनी चक्क मालेगाव इथल्या शासकीय रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या मारहाणीचे कारण फक्त डॉ. डांगे यांनी फोन उचलला नाही म्हणून मारहाण केली असल्याचे सांगण्यात येत आहे. करोना प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली आहे. आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

