Share

‘देवीभक्तांनी स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला कोरोनाची लागण होणार नाही याची काळजी घ्यावी’

Published On: 

मुंबई  – आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. आदिशक्तींची पूजा देशभरात या काळात केली जाते. महाराष्ट्रात तुळजापूर, कोल्हापूर, वणी आणि माहूर या साडेतीनशक्तिपीठांमध्ये पारंपरिक पद्धतीने हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या काळात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर राज्यातील लाखो भाविक देवीचे मनोभावे दर्शन घेत असतात.

या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे मंदिरे उघडलेली नाहीत. या उत्सव काळात देवींचे सर्व धार्मिक विधी पार पडणार असल्याचेदेवस्थान समितींमार्फत असून भाविकांना देवींचे दरवर्षीप्रमाणे दर्शन घेता येणार नाही. मंदिर व्यवस्थापनांनी भक्तांसाठी ऑनलाइन दर्शनाची सोय करून दिली आहे.भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या, देवीरुपातील स्त्रीशक्तीचे दररोज पूजन होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाची उद्यापासून सुरुवात होत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव साजरा करताना सोशल डिस्टन्सिंग, कोरोनाप्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन होईल. यंदाचा नवरात्रोत्सव साधेपणाने व शक्यतो घरीच साजरा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करीत, नागरिकांनी, देवीभक्तांनी उत्सवकाळात स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला कोरोनाची लागण होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवरात्रोत्सव हा स्त्रीशक्तीचे पूजन करण्याचा उत्सव. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्रीदुर्गामाता, श्रीअंबामाता, श्रीरेणुकामाता, श्रीलक्ष्मी, श्रीसरस्वती आदी रुपातील स्त्रीशक्तीचे पूजन करताना आपल्या कुटुंबातील, गावातील, शहरातील, समाजातील माता-भगिनींचाही सन्मान वाढवण्याचे काम झाले पाहिजे. माता-भगिनींना त्यांचा हक्क, न्याय, सन्मान मिळेल. त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि होऊ देणार नाही असा संकल्प आजच्या घटस्थापनेच्या निमित्ताने करुया असेही शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!