टीम महाराष्ट्र देशा :अभिनेत्री केतकी चितळे पाठोपाठ आता कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील सोशल मिडीयावर अर्वाच्च भाषेत शिव्यागाळी आणि धमक्या येत असल्याची तक्रार केली आहे.खासकरून ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक सकारवर टीका करणाऱ्यांना समाजमाध्यमांवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमक्या देत आहेत. सोशल मिडीयावरील या विकृतांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
सचिन सावंत यांनी पत्र लिहित मुख्यमंत्री फडणवीस यांना याबाबतची तक्रार केली आहे. या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, गेल्या दोन दिवसांपासून सरकारवर केलेल्या टीकेवरील ट्वीट संदर्भात समाजमाध्यमांवर अत्यंत हीन पातळीवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली जात आहे. तसंच फोनवरून व समाजमाध्यमांवरून जाहीर धमक्या दिल्या जात आहेत. यामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक असल्याचा दंभ या धमक्या देणाऱ्यांकडून दाखवला जात आहे. प्रश्न हा आहे की विरोधकांनी केलेली टीका सरकारला आवडत नाही का?’ असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
