Share

टी-२० क्रिकेट विश्वचषक: आयसीसीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

Published On: 

दिल्ली: कोरोनामुळे क्रिकेट चाहत्यांना आता अजून एक धक्का बसत आहे. या विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे अखेर ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकलण्यात आलेलं आहे. यानंतर आता आयपीएलच काय होणार याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. सोबतच आयसीसीने सुधारित तारीख देखील सांगितली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयसीसी विचार करत होतं, परंतू यजमान क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजन करण्याबद्दल असमर्थता दर्शवल्यानंतर अखेरीस आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतू करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता ऑस्ट्रेलियन सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत संपूर्ण देश लॉकडाउन केला. मध्यंतरीच्या काळात ऑस्ट्रेलियन सरकारने नियमांमध्ये शिथीलता आणली होती. परंतू रुग्णांची संख्या वाढताच सरकारने परत लॉकडाउन घोषित केलं आहे.

अण्णा हजारेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, दिला आंदोलनाचा इशारा

त्यामुळे, एकंदर परिस्थिती आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियावरचं आर्थिक संकट लक्षात घेता, विश्वचषकाचं आयोजन करणं अशक्य असल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याआधीच जाहीर केलं होतं. त्यानंतर स्पर्धेचं आयोजन पुढे ढकलणं जाणं ही फक्त एक औपचारिकता राहिली होती.  सोबतच, २०२१ साली होणारा टी-२० विश्वचषक हा ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात खेळवला जाईल असंही आयसीसीने जाहीर केलं आहे.

दरम्यान, आता टी-२० विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकलण्यात आल्यानंतर बीसीसीआयसमोर आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला असून तेराव्या हंगामाच्या आयोजनासाठी बीसीसीआयने तयारी सुरु केली होती, फक्त आयसीसीने टी-२० विश्वचषकाबद्दल अधिकृत घोषणा जाहीर करण्याची वाट बीसीसीआयला पहायची होती. आज आयसीसीने घोषणा केल्यानंतर लवकरच बीसीसीआय आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल अधिकृत घोषणा करेल.

मुंबई सारखे सोलापूरमध्ये ‘चेस दि व्हायरस’ प्रभावीपणे राबवा – उद्धव ठाकरे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!