अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकींबाबत नाराजी त्यांनी या पत्रातून व्यक्त केली असून लोकशाहीची पायमल्ली असल्याचे देखील ते बोलले आहेत. तसेच, जर हा निर्णय झाला तर आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी या पत्राद्वारे दिला आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमताना पालकमंत्र्यांचा सल्ला घ्यावा. तसेच ग्रामविकास विभागाने घटनेची आणि कायद्याची पायमल्ली करुन घटनाबाह्य परिपत्रक काढून जनतेची दिशाभूल केली आहे, असेही अण्णांनी या पत्रात म्हटलं आहे. हा निर्णय घेणे म्हणजे मंत्र्यांचा गृहपाठ कच्चा असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांना कायदा, घटना यांचा अभ्यास करणे गरजचे आहे, असा सल्ला देखील अण्णा हजारेंनी दिला.
मोठी बातमी : २२ तारखेला होणार शरद पवारांचा शपथविधी
याचसोबत या निर्णयामुळे राज्यात पक्षाची, पक्षाने, पक्ष सहभागातून शाही येऊन लोकशाही पायदळी तुडवली जाईल अशी खंत देखील व्यक्त केली आहे. तसेच, घटनेत पक्ष पार्टीचा उल्लेख कुठेही नसून ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे अधिकार पालकमंत्र्यांना देऊन पक्ष पार्टीच्या माणसांचा हस्तक्षेप होणे बेकायदेशीर आहे हे नाकारता येत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
१ ऑगस्टचं आंदोलन भाजपाने आजच कसं केलं?: पशु व दुग्ध विकासमंत्री सुनील केदार
तर, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारतर्फे पुण्यात मुदत संपलेल्या ७५० ग्रामपंचायतींमध्ये एक प्रशासक नेमण्याची तरतूद केली आहे. मात्र, प्रशासक पदावर नियुक्ती व्हावी यासाठी अर्ज करत असताना पक्षाला ११ हजारांचा पक्षनिधी द्यावा लागेल, अशी अट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पुणे यांच्यातर्फे घालण्यात आली होती. यानंतर या प्रकरणावर सर्वच स्थरातून टीका करण्यात आली होती.
विवाहविषयक वेबसाईटवर सायबर भामट्यांकडून ‘अशी’ होतेय फसवणूक
राज्यातील १९ जिल्ह्यातील एक हजार ५६६ ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल ते जून २०२० दरम्यान समाप्त झाली आहे. तर १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर २०२० च्या दरम्यान समाप्त होणार आहे त्यामुळे, मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर संबंधित गावातील व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वेळा पत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य होणार नाही.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

